AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकातील थ्रीप्सचे नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकातील थ्रीप्सचे नियंत्रण!
➡️थ्रिप्स (फुलकिडे) कांदा पिकाचे नुकसान करणारी प्रमुख कीड असून,कांद्यामध्ये फुलकिडीची पिल्ले आणि प्रौढ कीटक पाने खरडून पानातील रस शोषून घेतात. पानांवर पांढरे ठिपके दिसतात. ➡️असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होऊन वळतात.परिणामी फुलकिड्यांमुळे कांद्याचे उत्पादन ३० ते ४० टक्के घटू शकते. ➡️पिकाच्या कुठल्याही अवस्थेत ही कीड येते. ➡️या किडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील ५% एससी @४०० मिली प्रति एकर २०० पाण्यामध्ये मिळसून १५ दिवसांच्या अंतराने ➡️फवारणीपरिणामकारकता वाढवण्यासाठी त्यांत चिकटद्रव्यांचा वापर करावा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
89
46
इतर लेख