गुरु ज्ञानAgrostar
कांदा पिकातील करपा रोगासोबतच करा थ्रिप्स किडीचे नियंत्रण
कांदा लागवडीनंतर सुरुवातीच्या अवस्थेत बदलत्या वातावरणामुळे करपा रोग व थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो. योग्य वेळी नियंत्रण न केल्यास पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे किंवा प्रादुर्भाव कमी असल्यावर तत्काळ उपाय करणे महत्त्वाचे आहे.
👉करपा रोग व थ्रिप्स कीड यांचे एकत्रित नियंत्रण करण्यासाठी खालील उपाययोजना करा:
1. थायोमेथॉक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असणारे किल एक्स @ 0.8 मिली प्रति लिटर पाणी याचा फवारणीसाठी वापर करा.
2. मेटॅलॅक्सिल + मॅन्कोझेब घटक असणारे मेटल ग्रो @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याचा समावेश करा.
3. या मिश्रणासोबत उत्तम परिणामासाठी स्टिकरचा वापर अवश्य करा, त्यामुळे औषधाची प्रभावीता वाढते.
👉फवारणीसाठी सकाळी किंवा संध्याकाळी वेळ निवडावी. पिकातील रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी असल्यास वेळेवर नियंत्रण करून उत्पादनात होणारे नुकसान टाळता येते व उत्पन्नामध्ये वाढ करता येते.
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.