AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकातील करपा रोगाचे नियंत्रण!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कांदा पिकातील करपा रोगाचे नियंत्रण!
कांदा पिकात जांभळा, काळा आणि तपकिरी करपा असे तीन प्रकारच्या करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. जांभळ्या करप्यामुळे पानावर खोलगट जांभळट लालसर चट्टे दिसतात. चट्ट्याचे प्रमाण वाढल्यामुळे शेंड्याकडून पात जळत येते. काळ्या करप्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानांवर, मानेवर गोलाकार काळे ठिपके दिसून येतात. आणि तपकिरी करप्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पातीवर बुध्यांकडून शेंड्यापर्यंत पिवळसर तपकीरी चट्टे आढळून येतात. यावर उपाययोजना म्हणून रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच पिकात ऍझॉक्सिस्ट्रॉबीन + टेब्युकोनॅझोल घटक असलेले कस्टोडिया बुरशीनाशक 240 मिली प्रति एकर फवारावे तसेच फुलकिडीचा प्रादुर्भाव नियंत्रित ठेवावा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
125
8