गुरु ज्ञानAgroStar
कांदा पिकातील कंद कूज समस्या आणि उपाय
👉🏻कांदा पिकामध्ये कंद कूज समस्या प्रामुख्याने जमिनीत दीर्घकाळ अतिरिक्त ओलावा आणि कमी तापमान असल्याने दिसून येते. या समस्येमुळे कांदा उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागतो.
👉🏻रोगाची सुरुवात प्रामुख्याने जुनी पात पिवळी पडून जळून जाण्याने होते. बुडाजवळ जमिनीजवळ पांढऱ्या रंगाची बुरशी तयार होऊ लागते. हळूहळू कांद्याच्या मुळांवर आणि कंदांवर परिणाम होऊन ते काळसर होऊन कुजायला लागतात.
👉🏻कंद कूज टाळण्यासाठी उपाय:
1.पाणी व्यवस्थापन: कांदा पिकाला जमिनीतून पुरेसा वापसा मिळेल अशा पद्धतीने पाणी द्यावे. अतिरिक्त पाणी देणे टाळा.
2. खत व्यवस्थापन: पीक पद्धतीत अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर कमी करावा.
3. औषधांचा वापर:
- थायोफिनेट मिथाईल घटक असलेले बुरशीनाशक @ 500 ग्रॅम प्रति एकर वापरावे.
- कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असणारे कूपर 1 @ 500 ग्रॅम याचा वापर करावा.
- ह्युमिक पावर एनएक्स @ 400 ग्रॅम खतांमध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.
👉🏻वरील उपाय योजनांचा अवलंब केल्यास कांदा पिकातील कंद कूज समस्येवर नियंत्रण मिळवून उच्च दर्जाचे उत्पादन मिळवता येते.
👉🏻संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.