गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकाच्या वाणांची निवड करताना घ्यावयाची काळजी !
🌱महाराष्ट्रात कांदा पिकाचे उत्पादन हे खरिप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु पिकामध्ये कंदाचा आकार, रंग व्यवस्थित न होणे तसेच कांदा वाढीच्या अवस्थेतच त्याला फुले लागणे ह्या समस्या वातावरणाच्या बदलासोबतच अयोग्य वाणाची निवड केल्यामुळे देखील होऊ शकते, यावर उपाय म्हणून कांदा बियाणे निवड करताना ते खरिप किंवा उशिरा खरिप हंगामासाठी तसेच आपल्या विभागासाठी योग्य आहे का याची खात्री करूनच वाण निवडावे व योग्य हंगामातच त्याची लागवड करावी.
🌱हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.