AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा आणि लसणाचे भाव वाढणार, केंद्र सरकारने घेतला मोठा  निर्णय !
बाजारभावAgrostar
कांदा आणि लसणाचे भाव वाढणार, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय !
🌱यंदा कांदा आणि लसूण पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना कमी भाव मिळाल्याने अद्यापही तोटा सहन करावा लागत आहे.विशेष म्हणजे देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये कांदा आणि लसणाचे भाव सध्या कमी आहेत. परंतु आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून काहीसा दिलासा मिळणार आहे.जाणून घ्या केंद्र सरकारने कोणता निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर ठरणार आहे. 🌱देशभरात कांद्याच्या भावावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील कांदा-लसूण उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.हे पाहता नुकतेच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी सांगितले की, त्यानुसार कांदा आणि लसूणचे भाव कमी होत आहेत.त्यादृष्टीने आम्ही केंद्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये कांदा व लसणाच्या भावाबाबत चर्चा करण्यात आली व शेतकरी बांधवांना कांदा व लसणाला चांगला भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्राच्या या निर्णयानंतर राजस्थानमध्ये सरकारी पातळीवर कांदा आणि लसूण खरेदी सुरू होणार आहे. 🌱महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह राजस्थानमध्ये कांदा आणि लसणाची लागवड अधिक आहे. या दोन्ही पिकांना मिळालेला भाव कमी असल्याने यंदा येथील शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने कांदा व लसूण खरेदीचा सरकारी पातळीवर तातडीने निर्णय घेतला आहे. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
46
9
इतर लेख