AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदयापाठोपाठ लसूण ही महागला!
कृषि वार्तालोकमत
कांदयापाठोपाठ लसूण ही महागला!
नाशिक – आता कांदयाबरोबरच लसूणच्या ही किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्य प्रदेशातून येणाऱ्या लसूणची आवक मोठया प्रमाणात घटल्याने दर गगनाला भिडले आहेत. मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात साध्या लसूणचे किलोचे दर २०० तर गावठी लसूणचा भाव ३०० रूपयांपर्यंत पोहोचले आहेत.
बाजारसमितीत लसूणला कमीत कमी १०० ते १२० रू. किलो असा होलसेल बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात लसूण खरेदी करणाऱ्या या ग्राहकांना लसूणच्या ४ कांडया म्हणजे १०० ग्रॅम खरेदीसाठी किमान २० ते २५ रू. लागत असल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत. ३ ते ४ वर्षीपूर्वी लसूणची मोठया प्रमाणात आवाक झाल्याने बाजारभाव घसरले होते. मागीलवर्षी लसूणला ५ ते १५ रू. किलो बाजारभाव मिळत होता. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने लसूण उत्पादकांनी लागवड कमी केली. परिणामी यावर्षी उत्पादन घटल्याने लसूण बाजारभावाने उच्चांक गाठला आहे. संदर्भ – लोकमत, २३ डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
17
0