AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कसा, असेल यंदाचा मान्सून  !
हवामान अपडेटसकाळ
कसा, असेल यंदाचा मान्सून !
➡️राज्यात यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला. यावर्षी सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात 880 मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ➡️राज्यात तापमानात किंचित घट झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाळी स्थिती असल्यामुळे पारा खाली आलाय. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात आणखी दोन ते तीन दिवस पावसाळी स्थिती राहणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. ➡️देशभरातील पाऊस सरासरीइतका होणार असला तरीही राजस्थान, गुजरात आणि ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा येथे या मोसमात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय केरळ आणि उत्तर कर्नाटकच्या अंतर्गत भागात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य महिन्यांमध्ये पाऊस कमी होईल. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश, उत्तर भारतातील कृषी क्षेत्रांत आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या पर्जन्यक्षेत्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल. मोसमातील पहिले दोन महिने शेवटच्या दोन महिन्यांपेक्षा अधिक चांगले. ➡️संदर्भ: Sakal हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
0
इतर लेख