AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कसदार माती असेल तर जोमदार पीक दिसेल!
योजना व अनुदानAgrostar
कसदार माती असेल तर जोमदार पीक दिसेल!
👉🏻खतांच्या वापरामुळे जमिनीतील पोषक घटकांची कमतरता दूर करण्याच्या उद्देशाने सन 2014-15 मध्ये 'मृदा आरोग्य कार्ड योजना' सुरू करण्यात आली. मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना हेल्थ कार्ड देण्यात येणार असून त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मातीच्या प्रकाराची माहिती देण्यात येणार असून, जमिनीच्या गुणवत्तेच्या आधारे शेतकरी चांगले पीक घेऊ शकतो. 👉🏻मृदा आरोग्य कार्ड कसे काम करते - शासनाच्या या योजनेंतर्गत कृषी अधिकारी शेतातील मातीचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवतात. जिथे शास्त्रज्ञांद्वारे मातीचे नमुने तपासले जातात. काही दिवसांनंतर, मातीचा अहवाल तयार केला जातो आणि ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केला जातो, जेणेकरून शेतकर्‍यांना त्यांच्या शेतातील मातीचा अहवाल कोणत्याही अडचणीशिवाय पाहता येईल. याशिवाय काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मातीचा अहवालही छापून अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या घरी पाठवला जातो, जेणेकरून जे शेतकरी ऑनलाइन अहवाल पाहू शकत नाहीत त्यांना ऑफलाइन अहवाल मिळू शकेल. 👉🏻असे बनवा मृदा आरोग्य कार्ड - - अर्जदाराला https://soilhealth.dac.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. - यानंतर लॉगिन पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करावं लागेल. - राज्य सिलेक्ट केल्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक करा, त्यानंतर लॉगिन फॉर्म उघडेल, ज्यामध्ये नवीन नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये युजर ऑर्गनायझेशन डिटेल्स, भाषा, युजर डिटेल्स, युजर लॉगिन अकाऊंट डिटेल्स इत्यादी भरावे. - सर्व माहिती नीट भरल्यानंतर ती सबमिट करावी, नोंदणी यशस्वी झाल्यानंतर लॉगिन करून होम पेजवर लॉगिन फॉर्म ओपन करावा लागेल. 👉🏻मृदा आरोग्य कार्डशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती घरबसल्या मिळवायची असेल, तर सरकारने जारी केलेल्या हेल्पलाइन क्रमांकांवर देखील संपर्क साधता येतो - 011-24305591 आणि 011-24305948. तसेच helpdesk-soil@gov.in वर ईमेल करून माहिती मिळता येते. 👉🏻संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
1