AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड लागवडीविषयी महत्वाची माहिती! 🍉
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड लागवडीविषयी महत्वाची माहिती! 🍉
जमीन - • कलिंगड हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. • चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणार्‍या सोडियम, कॅल्शियम, मॅग्रशियम सल्फेट, क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्या विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याची शक्यता असते. • लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, मध्यम-काळ्या ते करड्या रंगाची व पाण्याचा निचरा असणारी जमीन लागवडीस योग्य आहे. पूर्वमशागत- • जमिनीची खोल नांगरणी करून प्रति एकरी चांगले कुजलेले १५ ते २० टन शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. • त्यानंतर ट्रॅक्‍टर किंवा बैलांच्या साह्याने वखराच्या दोन पाळ्या घालाव्यात. • रोटावेटरचा जर उपयोग केला तर खत जमिनीत चांगले मिसळते व जमीन सपाट होते. • यानंतर गादीवाफे तयार करून घ्यावेत. • गादीवाफ्याचा आकार दोन फूट रुंद व एक फूट ठेवावा. दोन गादीवाफे मध्ये सहा फूट अंतर ठेवावे.
79
7
इतर लेख