क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड पिकासाठी योग्य वाणांची निवड!
सध्या शेतकरी मित्रांचा कलिंगड लागवडीकडे वाढलेला कल पाहता, आपल्याकडील भागामध्ये जास्तीत जास्त मागणी असलेल्या वाणांची निवड करावी यासाठी आपण खाली दिलेली माहिती पाहावी. प्रकार - ज्युबिली ओव्हल: • पोपटी रंगाचे फळ असून हिरवे पट्टे असतात. • एका फळाचे वजन साधारणतः ८ ते १२ किलो मावते. • ८० ते ९० दिवसात पक्वता होते. • लाल रंगाचा गर • (११ ते १२% टीएसएस) चांगली गोडी • या प्रकारातील वाण- नामधारी NS 295, मधुबाला प्रकार - शुगर बेबी: • एका फळाचे वजन साधारणतः - ५ ते ७ किलो • पक्वता - ८० ते ९० दिवसात • गर गर्द लाल • फळाचा रंग गर्द हिरवा ते काळपट • गोडी - ११-१२% TSS • या प्रकारातील वाण- ऑगस्टा, शुगर पॅक, पटानेगरा प्रकार - आईस बॉक्स: • सर्वाधिक मागणी व उत्पादन क्षमता असणारे वाण • निळसर, काळपट फळ • फळाचे वजन - ३ ते ४ किलो • ६० ते ७० दिवसात पक्वता • सर्वात गोड - १२ ते २३ TSS • या प्रकारातील वाण- शुगर क्वीन, सागर किंग, मॅक्स, हनी, मेलोडी, किरण, किरण २, शुगर किंग. बियाणे खरेदी करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-S-3154,AGS-S-2815,AGS-S-2189&pageName= क्लिक करा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
51
13
संबंधित लेख