सकाळअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड पिकातील फळ फुल व्यस्थापन!
👉 कलिंगड पीक फुलोरा आणि फळ धारणा अवस्थेत असताना ००:५२:३४ ची ३ ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी . 👉 फुलोरा अवस्थेत ०:५२:३४ सोबत सूक्ष्मअन्नद्रव्यांची फवारणी केल्यास बोरॉनची उपलब्धता होऊ शकते. बोरॉनच्या कमतरतेमुळे फळांचे तडकण्याचे प्रमाण वाढते. 👉 फळ पोसत असताना १३:००:४५ या विद्राव्य खताची ३ ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 👉पाण्याच्या अनियमित वेळ व मात्रेमुळे फूल व फळांची गळ होऊ शकते, तसेच फळे तडकण्याचा संभव असतो. 👉 हे टाळण्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याची मात्रा व वेळ निश्चित करावी. 👉 फळ लागण्यास सुरवात झाल्यास पाण्याचा ताण बसू देऊ नये. पाणी दुपारच्या वेळी देऊ नये. संदर्भ:- सकाळ, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
45
15
इतर लेख