AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
🍉कलिंगड पिकातील नागअळीचे नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
🍉कलिंगड पिकातील नागअळीचे नियंत्रण!
कलिंगड पिकात नागअळी या किडीचा मोठा धोका असतो. ही अळी वेलीचे पान पोखरते, त्यामुळे पानांवर नागमोडी, पिवळट, जाड रेषा दिसतात. पाने पिवळी पडून गळतात. त्यामुळे फळांचे पोषण होत नाही. फळे वेडीवाकडी होऊन मागणी कमी होते. 👉 एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करताना पिवळे चिकट सापळे, फळमाशी गंध सापळे, प्रकाश सापळे (लाईटट्रॅप) अशा तीन सापळ्यांचा प्रयोग शिफारसीप्रमाणे करावा. पीक ३, ४ पानांच्या अवस्थेतेत असताना नियंत्रणासाठी निंबोळी अर्क @३ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात प्रतिबंधात्मक फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
28
3
इतर लेख