AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड पिकातील थ्रिप्स किडीचे नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कलिंगड पिकातील थ्रिप्स किडीचे नियंत्रण!
➡️ फुलकिडींच्या (थ्रिप्स) तोंडामध्ये एकच झबडा असल्यामुळे त्यांना रस शोषण करता येत नाही. प्रादुर्भावग्रस्त भाग कुरतडून खाता येत नाही. प्रथम जबड्याच्या साहाय्याने ते पानांच्या वरचा भाग खरवडतात व त्यातून पाझरणा-या रसावर उपजीविका करतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडाची वाढ खुंटते. काही पिकांमध्ये फुलकिडे विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात. ➡️ कलिंगड पिकात या किडीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी किंवा प्रादुर्भाव दिसून येताच निंबोळी अर्काचा वापर करावा व प्रति एकरी ६ निळे व पिवळे चिकट सापळे बसवावे. प्रादुर्भाव वाढत असल्यास शिफारशीनुसार औषधांचा वापर करावा. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
3