AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड पिकाच्या अधिक व गुणवत्तापूर्ण उत्पादनाचे नियोजन!🍉
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
कलिंगड पिकाच्या अधिक व गुणवत्तापूर्ण उत्पादनाचे नियोजन!🍉
शेतकरी मित्रांनो, कलिंगड पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी पिकाचे सुरुवातीपासूनच योग्य नियोजन करणे गरजेचे असते. या पिकामध्ये साधारणतः ४० ते ४५ दिवसांमध्ये फुलधारणा होण्यास सुरुवात होते या अवस्थेत पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी १२:६१:०० @३ किलो प्रति एकर एक दिवसा आड ठिबकद्वारे द्यावे. तसेच अमिनो ऍसिड @३० मिली + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. त्यानंतर ४ दिवसांनी चिलेटेड कॅल्शिअम @१० ग्रॅम + बोरॉन २०% @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. पिकामध्ये उत्तम गुणवत्तेची फळे 🍉 मिळण्यासाठी रसशोषक किडींचा प्रतिबंधात्मक पद्धतीने व्यवस्थापन करावे. तसेच एका वेलीला २ किंवा ३ फळांची संख्या ठेवावी यामुळे पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्येचा पुरवठा होऊन फळांची वाढ व गुणवत्ता चांगली झालेली मिळते. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
13
0
इतर लेख