AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड पिकाचे योग्य व्यवस्थापन
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड पिकाचे योग्य व्यवस्थापन
कलिंगड पिकाचे चांगले, जोमदार वाढ आणि भरघोस उत्पादनासाठी या पिकाचे योग्य खत व पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. अन्नद्रव्ये - खत व्यवस्थापन : या पिकाला माती परीक्षणानुसारच रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा देणे आवश्यक आहे. या पिकाच्या योग्य, जोमदार वाढीसाठी निंबोळी पेंड @४० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट @५० किलो, म्युरेट ऑफ पोटॅश @५० किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये @५ किलो, सल्फर @३ किलो प्रति एकरी एकत्र मिसळून लागवडीवेळी खतांची मात्रा द्यावी. त्यानंतर पिकाची अवस्था आणि आवश्यकतेनुसार ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खते शिफारशीनुसार द्यावीत.
• लागवडीपासून ते २५ दिवस - १९:१९:१९ @१ किलो प्रति एकर/ दिवस. • २० ते ३५ दिवस - १२:६१:०० @१.५ किलो प्रति एकर /दिवस. • ३० ते ५० दिवस - कॅल्शिअम नायट्रेट @५ किलो प्रति एकर २ वेळा • ३६ ते ४५ दिवस - १३:००:४५ @१.५ किलो प्रति एकर / दिवस. • ५० ते ६५ दिवस - ००:५२:३४ @१.५ किलो प्रति एकर / दिवस. • ६० ते ६५ दिवस - पोटॅशिअम शोनाईट @५ किलो प्रति एकर १ वेळा फवारणीचे व्यवस्थापन:- • या पिकाच्या लागवडीनंतर १० - १५ दिवसांत १९:१९:१९ @ २.५-३ ग्रॅम + सुक्ष्म अन्नद्रव्ये २.५-३ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणत फवारणी करावी. • त्यानंतर ३० दिवसांनी फुलोरा अवस्थेत - बोरॉन @१ ग्रॅम + सुक्ष्म अन्नद्रव्ये २.५-३ ग्रॅम. • फळधारणा अवस्थेत - ००:५२:३४ @ ४-५ ग्रॅम + मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) २.५-३ ग्रॅम, ००:५२:३४ @ ४-५ ग्रॅम + बोरॉन १ ग्रॅम. • फळ पोसत असताना १३:००:४५ @ ४-५ ग्रॅम, कॅल्शियम नायट्रेट @ २-२.५ ग्रॅम हे प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. प्रत्येक फवारणीमध्ये ४ दिवसांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापन: हे पीक पाण्याबाबत खूपच संवेदनशील आहे. सुरूवातीच्या काळामध्ये पिकाची पाण्याची गरज कमी असते. पाच ते सहा दिवसांचे अंतराने पाणी द्यावे. सकाळी ९ च्या आत पाणी द्यावे. पुढे पीक वाढीनुसार पाण्याची गरजही वाढत जाते. पाण्याच्या पाळ्या अनियमित दिल्यास फळे तडकण्याचा किंवा त्यांचा आकार बदलण्याचा संभव असतो. जमिनीचा प्रकार आणि पीकवाढीचे टप्पे लक्षात घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करावे. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर, फोटोखाली दिलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा!
758
9
इतर लेख