AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड आणि खरबूज पिकातील फळ माशीचे नियंत्रण!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कलिंगड आणि खरबूज पिकातील फळ माशीचे नियंत्रण!
▶️शेतकरी बंधूंनो उन्हाळ्यात कलिंगड व खरबूज पिकामध्ये फळ माशीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. ▶️प्रौढ मादी माशी फळाच्या सालीमध्ये अंडी घालते. ▶️अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या फळांमध्ये शिरतात व आतील गर खातात. ▶️प्रादुर्भावग्रस्त लहान फळे जमिनीवर पडतात. ▶️हि फळे कुजतात व त्यामधून दुर्गंधीत वास येतो. फळांचा आकार बदलतो. ▶️जिथे अंडी घातलेली असतात तिथून फळातून चिकट द्रव बाहेर येतो. हा द्रव वाळतो आणि त्याचे तपकिरी रंगाच्या डिंकात रूपांतर होते. ▶️यामुळे, फळावर डाग पडतात आणि फळाची गुणवत्ता घसरते. ▶️या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास पिकाचे १००% नुकसान होण्याची शक्यता असते. ▶️ही कीड उष्ण हवामानात अधिक सक्रिय असते. ▶️याच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त फळे आणि डाग पडलेली फळे ▶️गोळा करून मातीत गाडून नष्ट करावीत. ▶️पीक नेहमी तणमुक्त ठेवावे. ▶️पिकाच्या भोवती एक दोन ओळी मका पिकाची लागवड करून त्यावर नियमित कीटकनाशकाची फवारणी करावी. ▶️प्रौढ माशीच्या नियंत्रणासाठी गूळ @ ४५० ग्रॅम १० लिटर पाण्यात विरघळवून २४ तास ठेवा आणि फुलधारणा सुरुवात झाल्यास आठवड्यातून एकदा १० मिली डीडीव्हीपी मिसळून पीकांवर फवारणी करावी. ▶️फळ माशीच्या नरांना आकर्षक करून नष्ट करण्यासाठी प्रति एकरी 'क्यू ल्युर सापळे' @ ८ ते १० प्रत्येकी १ मीटर अंतरावर लावावे. ▶️सापळ्यांमधील माश्या प्रत्येकी २ आठवड्यांनी काढून नष्ट कराव्यात. ▶️पीक कालावधीत असे सापळे प्रभावी असतात, त्यामुळे हे सापळे बदलू नयेत. ▶️शेतात एकमेकांना समान अंतरावर सापळे स्थापित करा. ▶️जर सापळे लाकडी काठीच्या सहाय्याने स्थापित करत असाल तर त्याला वाळवी लागणार नाही याची काळजी घ्यावी. ▶️हवा किंवा वार्‍यामुळे सापळे पडणार नाहीत अश्या पद्धतीने सापळे बसवावेत. ▶️कुत्रे किंवा इतर जनावरांपासून सापळ्यांचे संरक्षण करावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
23
11