AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना
कृषी वार्तालोकमत
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता राज्य शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना लागू केलेली आहे. या योजनेमध्ये १०० टक्के अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. आता जिरायतीसाठी प्रतिएकरी ५ लाख रुपये आणि बागायतीसाठी प्रतिएकरी ८ लाख रुपये इतके अनुदान मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ४ एकरापर्यंत जिरायती जमीन किंवा २ एकरापर्यंत बागायती जमीन लाभार्थ्यास देण्यात येईल.
लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे किमान वय १८ व कमाल वय ६० असावे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबप्रमुखाचे वय ६० पेक्षा जास्त असेल, तर कमी वय असलेल्या त्याच्या पत्नीला याचा लाभ मिळेल._x000D_ संदर्भ - लोकमत, २० डिसेंबर २०१८
11
0