AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक !
कृषी वार्ताकृषी जागरण
कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक !
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 च्या अंतर्गत योजनेच्या अंमलबजावणीचे कामकाज अंतिम टप्प्यात असून लवकर ही योजना पूर्णत्वाला नेली जाणार आहे. या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आधार प्रमाणीकरणाच्या यादीत आहेत, परंतु अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही त्यांच्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी 15 नोव्हेंबर पर्यंतचअंतिम मुदत देण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकले नाही त्यांना कर्जमुक्ती पासून अद्यापही वंचित राहावे लागले आहे. आशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने नवी संधी दिली असून 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांना आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. आधार प्रमाणीकरण कुठे करावे? ज्या शेतकऱ्यांचे कर्ज मुक्ती यादीत नाव आहे अशा शेतकऱ्यांनी त्यांचे पासबुक, आधार कार्ड घेऊन संबंधित बँकत किंवा जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- कृषी जागरण, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
92
25