AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
करा, योग्य पद्धतीने कांद्याची साठवणूक!
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
करा, योग्य पद्धतीने कांद्याची साठवणूक!
बरेच शेतकरी आपल्या कांदा पिकाला भाव चांगला नसल्यास त्याची साठवण करून ठेवतात व योग्य भाग मिळेल त्यावेळी बाजारात पाठवतात. परंतु हा कांदा टिकून राहण्यासाठी योग्य साठवणूक देखील करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कांदा साठवणुकीवेळी क्लोरो पावडर @५ किलो + सल्फर ९०% @१ किलो + बाविस्टीन @५०० ग्रॅम प्रति एकर उत्पादन कांद्यासाठी वापरावे. कांदा चाळीत किंवा बरखी मध्ये टाकण्यापूर्वी हि औषधे एकत्र मिसळून ते निर्जंतुकीकरण करून घ्यावे. यासाठी छत, भिंती, खालची जमीन,पोल, जाळी इत्यादी सगळ्या गोष्टींवर धुरळणी करावी आणि नंतर त्यात कांदा साठवावा. परंतु हे मिश्रण कांद्यावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. असे केल्याने कांदा खराब होण्याचे प्रमाण कमी होते.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
85
7
इतर लेख