AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
करा, मका पिकातील तणांचे प्रभावी नियंत्रण!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
करा, मका पिकातील तणांचे प्रभावी नियंत्रण!
मका ह्या पिकांचा सर्वात मोठा शत्रु म्हणजे तण. तणांचा मका पिकाशी अन्नद्रव्य आणि पाणी याबाबतीत स्पर्धा करण्याचा कालावधी पेरणीनंतर १५ ते ३५ दिवसांपर्यंतचा असल्याने तणांचा या कालावधीत बंदोबस्त केल्यास उत्पादन अधिक मिळते. तण पिकासाठी लागणारी पोषक तत्वे शोषण करून पिकाचे नुकसान तर करतातच, शिवाय कीड व रोगांच्या प्रादुर्भावास देखील कारणीभूत ठरतात.  नियंत्रण:- • ऍट्राझीन (५० टक्के) @५०० ग्रॅम प्रति एकर. • टोप्रामेझोन ३३६ एससी @३० मिली, ३०० मिली आऊटराईट सोबत प्रति एकर. • प्रति एकरी फवारणीसाठी १५० लिटर पाणी वापरावे.  काळजी:- • मातीमध्ये वाफसा/ ओलसरपणा असायला हवा. • तण ३-४ पानाच्या अवस्थेत असताना तणनाशकाचा उपयोग केल्यास सर्वात प्रभावी नियंत्रण मिळते. • फवारणी केल्यानंतर २-३ तास पाऊस नको. • फवारणी केलेले क्षेत्र पायाने तुडवू नये. याशिवाय तणनाशक फवारणीनंतर १५-२० दिवसांपर्यंत आंतरमशागत करू नये.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
72
22
इतर लेख