AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
करा! बागायती पिकांमधील वाळवीचे नियंत्रण
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
करा! बागायती पिकांमधील वाळवीचे नियंत्रण
• वाळवी किडीची मादी मातीत खूप खोलवर राहते. • वाळवी मातीमध्ये खोलवर राहून बागायती पिकांच्या मुळांचे नुकसान करून जमिनीतील कार्बनी पदार्थ खातात. • आपल्या पिकामध्ये वाळवीचा प्रादुर्भाव असल्यास झाल्याच्या बुंध्यालगत किंवा खोडांवर मातीचे वलय दिसून येतात, यामध्ये मादी कीड अंडी घालते. • तसेच या किडी झाडाची साल खाऊन खोडामध्ये प्रवेश करतात व आतील भाग खाऊन पोकळ करतात. • या कारणास्तव, झाडे वाळल्यासारखी दिसतात. • हि कीड फळ रोपांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान करते. • याच्या नियंत्रणासाठी, फळबागांच्या बांधावर वाळव्यांनी तयार केलेली वारुळे नष्ट करा. • उन्हाळ्यात फळबागाची खोल नांगरणी करुन जमिनीतील वाळवी नष्ट करता येते. • जर बागेत आंतरपीक घेतले असल्यास त्याची काढणी झाल्यानंतर पिकाचे अवशेष नष्ट करावेत. • चांगले कुजलेले शेणखत वापरा तसेच गांडुळेपासून बनविलेले सेंद्रिय खत, गांडूळखत वापरणे फायदेशीर ठरते.
• झाडाच्या बुंध्या भोवती निबोळी पेंड किंवा एरंड पेंड पसरवून टाकावी यामुळे पिकाचे वाळवीपासून संरक्षण करण्यासाठी मदत होते. • वाळवीद्वारे बनविलेल्या छिद्रावर क्लोरपायरीफॉस २० ईसी @ २५० मिली प्रति १० पाण्यात मिसळून टाकल्यास किडीच्या सर्व अवस्था नष्ट करता येतात. • नवीन बागायती पिकांवर, क्लोरपायरिफॉस २० ईसी @ ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या बुंध्याजवळून आळवणी करावी. • झाडाभोवतीची माती चांगली भूसभुशित करुन बागेत दोन पाण्यातील अंतर कमी करावे. म्हणजेच जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार पिकास पाणी द्यावे. संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
242
2
इतर लेख