अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
करा, कलिंगड वेलींची जोमदार व बळकट वाढ!
➡️ शेतकरी मित्रांनो, कलिंगड पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पिकाच्या जोमदार वाढीसाठी आपण विद्रव्ये खतांचा वापर तर करत असालच त्याच बरोबर आपण पिकामध्ये काळोखी सोबतच वाढ चांगली होण्यासाठी चिलेटेड झिंक @५०० ग्रॅम + चिलेटेड फेरस @५०० ग्रॅम प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे किंवा ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक सुविधा उपलब्ध यांनी त्यांनी फवारणीसाठी दोन्ही अन्नद्रव्ये प्रति १५ लिटर @१५-१५ ग्रॅम प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
➡️ यानंतर ४ दिवसांनी वातावरणातील बदलामुळे पिकावर येणार ताण कमी करण्यासाठी कीटोगार्ड @३० मिली + सिलिकॉन २% @२० मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे पिकाची प्रतिकारक शक्ती वाढून पीक बळकट बनते.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.