नई खेती नया किसानtv9marathi
कमी वेळेत अधिकचा नफा💸🤑, शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग!
➡️शेती व्यवसयातून उत्पन्न वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. मात्र, इतरांपेक्षा वेगळे करुन दाखवले आहे ते जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नामदेव माकोडे या शेतकऱ्याने.
➡️त्यांनी आयुर्वेदिक औषधे असणारे चिया बियाणाचे उत्पन्न घेतले आहे. या प्रयोग जिल्ह्यासाठी वेगळा असला तरी त्यांनी तीन महिन्यांमध्ये यशस्वी करुन दाखवला आहे.बाजारपेठेचा अभ्यास करुन हे पीक घेण्याचा निर्धार केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
चिया बियाणे म्हणजे नेमके काय?
➡️पारंपरिक पिकांपेक्षा आता ज्यामधून अधिकचे उत्पन्न मिळेल अशाच पिकांवर युवा शेतकऱ्यांचे लक्ष आहे. त्यानुसारच कळंब सारख्या तालुक्यातील शिराढोणच्या शिवारात चिया बियाणाचे पिक बहरत आहे.
➡️चिया बियाणे हे इतर खाद्य बियाणा प्रमाणेच आहेत. त्यांच्यामध्ये असलेल्या पोषक आणि औषधी गुणधर्मामुळे खाण्यामध्ये त्याचा वापर करतात. आरोग्या संबंधित समस्या दूर करण्यासाठी याचा अधिकचा उपयोग होतो. चिया बियाणांचा आकार खूप बारीक असून बियाणांचा रंग हा पांढरा, तपकिरी किंवा काळा असतो.
वेळेची बचत अन् खर्चही कमी💸🤑
➡️चिया बियाणांची लागवड केल्यापासून तीन महिने १५ दिवसांमध्ये उत्पादन मिळते. नामदेव माकोडे यांनी चिया बियाणे हे हरियाणा येथून ऑनलाईनद्वारे मागवून घेतले होते. नोव्हेंबरमध्ये लागवड करण्यात आली होती तर आता हे पीक अंतिम टप्प्यात आहे. साडेतीन एकरातील या पिकासाठी माकोडे यांना केवळ १२ हजार रुपये खर्च आलेला आहे. यामध्ये त्यांना २ लाखाचे उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे.
➡️चिया बियाणांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते, चिया बियाणांमध्ये विविध पोषक तत्त्व असतात. यामुळे बारामाही महिने या बियाणांना मागणी असते. त्यामुळे दर हे टिकून असतात. कमी वेळेत अधिकचे उत्पन्न यासाठी हा योग्य पर्याय आहे असे माकोडे यांनी सांगितले आहे.
संदर्भ:-TV9 Marathi,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.