AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कपाशीवरील बोन्डे सड समस्या!
गुरु ज्ञानAgrostar
कपाशीवरील बोन्डे सड समस्या!
🌱हवामानातील बदल जसे कि पावसाळ्यात पडणारा रिमझिम पाऊस, सतत ढगाळ वातावरण, हवेतील अधिक आद्रता यामुळे कापूस पिकामध्ये बोन्डे विकसित होण्याच्या अवस्थेत आंतरिक व बाह्य सड होते. 🌱बहुतेक वेळा बोडांवर बुरशीची वाढ झालेली दिसते. बोन्डातील एक ते दोन कप्पे तर काही ठिकाणी संपूर्ण बोन्डे सडलेली दिसतात. बोन्डे फोडून बघितल्यास आतील रुई व बिया पिवळसर-गुलाबी ते लाल-तपकिरी रंगाच्या होऊन सडलेल्या दिसतात. यामुळे उत्पादनात घट होते. 🌱उत्पादनात होणारी घट टाळण्यासाठी सुरुवातीला रोगाचा प्रादुर्भाव आढळ्यास किंवा सतत रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण असेल तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मॅन्कोझेब 75 % डब्लुपी घटक असणारे पनाका एम 45 बुरशीनाशक @ 2 ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 50% डब्लू जी घटक असणारे कूपर -1 @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर घेऊन फवारणी करावी. 🌱संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
6