AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कपाशीतील बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाय योजना.
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
कपाशीतील बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाय योजना.
शेतकरी बंधुनो, बोंड सडणे रोग ही समस्या प्रामुख्याने संधिसाधू व कमी प्राणवायू अवस्थेत तग धरणारे रोगकारक जिवाणू आणि काही प्रमाणात अंतर्वनस्पतीय रोगकारक बुरशी यांच्या संसर्गामुळे होतो. अशी बोंडे बाहेरून निरोगी दिसतात. मात्र, ती फोडली असता आतील रुई पिवळसर-गुलाबी ते लाल-तपकिरी रंगाची होऊन सडल्याचे दिसते.पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस दीर्घ काळ राहिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असते.यावरती उपाय म्हणून खालील बाबी कराव्यात. १. बोंडाना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. त्याठिकाणी ओलसरपणा राहून रोगकारक तसेच संधिसाधू जिवाणू व बुरशींची वाढ होणार नाही. २. पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः रस शोषक किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून वेळीच उपाययोजना कराव्यात.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
133
18