AgroStar
कपाशीची फरदड घ्यावी का?
सल्लागार लेखकृषि जागरण
कपाशीची फरदड घ्यावी का?
शेंदरी बोंडअळी ही कपाशीवरील अतिशय घातक कीड आहे. बी.टी. कपाशीमुळे या बोंडअळीचे यशस्वीरीत्या व्यवस्थापन होईल असा विश्वास होता. पण मागील ४-५ वर्षाचा अनुभव लक्षात घेता हा विश्वास खोटा निघाला. सध्या शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव बी टी कपाशीवर मोठया प्रमाणात आढळुन येत आहे. बीटी कपाशीवरील शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भावाची कारणे: • कपाशीच्या फरदडीखाली क्षेत्रात वाढ झाल्यामुळे किडीच्या जीवनक्रमात खंड पडत नाही. • हंगाम संपल्यानंतर कपाशीच्या पऱ्हाटया व अवशेष शेतात किंवा शेताजवळ तसेच रचून ठेवणे व वेळेवर विल्हेवाट न लावणे. • जास्त कालावधीचे कपाशीचे संकरित वाण. • विविध प्रकारच्या कपशीच्या संकरित वाणाची मोठी संख्या. • कच्च्या कापसाची जास्त कालवधीपर्यत साठवणूक. • कपाशीची लवकर लागवड. • बीटी जनुकास प्रतिकारशक्ती. • आश्रय पिकाच्या ओळी न लावणे. • योग्य वेळी शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन न करणे. • बीटी विषाचे प्रकटीकरण: शेंदरी बोंडअळी पाते, फुले व बोंडावर उपजिविका करते. बीटी विषाचे प्रकटीकरण कपाशीच्या पाते, फुले व बोंडामध्ये कमी प्रमाणात असते. त्याचबरोबर कोरडवाहु बीटी कपाशीमध्येसुध्दा बीटी विषाचे प्रकटीकरण कमी असते. • काही किटनाशके/किटकनाशकची मिश्रणे यांची फवारणी: कपाशीवर मोनोक्रोटोफॉस व अ‍ॅसिफेट ही किटकनाशके किंवा त्यांची मिश्रणे यांची फवारणी केल्यास कपाशीची कायिक वाढ होते. त्यामुळे फुले व बोंडे लागण्यामध्ये अनियमितता येते. त्यामुळे या किडीला सतत खाद्य उपलब्ध राहते. व्यवस्थापन: 👉 कपाशीचे फरदड घेऊ नये. वेळेवर कपाशीची वेचणी करून डिसेंबरनंतर शेतामध्ये कपाशीचे पीक घेऊ नये. 👉 हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळया, मेंढया, चरण्यासाठी सोडाव्यात. 👉 शेतातील पिकांचे अवशेष वेचून जाळून टाकावेत. 👉 हंगामात संपल्यावर ताबडतोब पऱ्हाटीचा वापर करावा किंवा बंदोबस्त करावा. शेतात किंवा शेताजवळ पऱ्हाटी रचून ठेवू नये. 👉सध्या बीटी कपाशीवरील शेंदरी बोंडबळीचा प्रादुर्भाव ही धोक्याची घंटा आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या चांगल्या पाऊसामुळे जमिनीमध्ये मोठया प्रमाणावर ओल आहे. त्यामुळे बरेचसे शेतकरी मोठया प्रमाणावर कपाशीचे फरदड (पुर्नबहार) चांगल्या दराच्या अपेक्षेने घेत आहेत. याचा परिणाम येत्या खरीप हंगामात या शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव लवकर व मोठया प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच जागरूक होऊन शेतकऱ्यांनी फरदड घेण्याचे टाळावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- कृषी जागरण., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
34
8
इतर लेख