कृषी वार्ताkrishi jagran
कडबा कुट्टी साठी शासन देते 'एवढे' अनुदान!
➡️जनावरांचा खुराक मध्ये चाऱ्याचा वापर सर्वात जास्त केला जातो. असे असले तरी, शेतातून आणलेला हिरवा चारा तसेच साठवून ठेवलेला कडबा जनावरांना जशाचा तसा खायला दिल्यास चाऱ्याचे नुकसान होते, परिणामी खर्चात वाढ होते. चार्याचे नुकसान टाळण्यासाठी अनेक पशुपालक शेतकरी कडबाकुट्टी चा वापर करून कुट्टी तयार करतात व ते कुट्टी जनावरांना खाण्यासाठी देतात.
➡️मात्र अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांना कडबा कुट्टी तयार करण्यासाठी लागणारे यंत्र परवडत नाही. म्हणूनच सरकारने गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कडबाकुट्टी अनुदान योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत पशुपालक शेतकऱ्यांना सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान शासनाद्वारे देण्यात येते.
➡️या योजनेद्वारे पशुपालक शेतकऱ्यांना कडबा कुट्टी चे यंत्र तसेच मोटार घेण्यासाठी शासनाकडून ७५ टक्के पर्यंतचे अनुदान दिले जाते. शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या या योजनेला जिल्हा परिषद अनुदान योजना म्हणून संबोधले जाते.
➡️या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही नियम व निकष लावून दिले आहेत, याच्या अधीन राहूनच पशुपालक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ७५ टक्क्यांपर्यंतचे अनुदान दिले जाते.
या योजनेसाठी अनुदान प्राप्त करने हेतु खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक असते
•या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार सातबारा धारक शेतकरी असावा तसेच तो महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वास्तव्यास असावा.
•तसेच अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या नावावर दहा एकर पेक्षा अधिक शेतजमीन नसावी म्हणजेच अर्जदार अल्पभूधारक शेतकरी असावा.
•अर्जदाराचे कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे अनिवार्य आहे तसेच अर्जदाराच्या बँक खात्याला त्याचा आधार क्रमांक लिंक असणे अनिवार्य आहे.
या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करने हेतु आवश्यक कागदपत्रे
•अर्जदाराच्या बँक पासबुकची झेरॉक्स
•अर्जदाराचे आधार कार्ड झेरॉक्स
•शेतकरी मित्रांनो या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी आपणास आपल्या ग्रामपंचायतीमध्ये भेट द्यावी लागेल. तसेच या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेसाठी महाराष्ट्रातील कुठलाही नागरिक जो सातबारा धारक शेतकरी असेल तो त्यांच्या ग्रामपंचायतीत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो.
संदर्भ:-कृषी जागरण,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.