AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कडधान्य आयातीला मुदतवाढ देण्याची मागणी
कृषी वार्ताअॅग्रोवन
कडधान्य आयातीला मुदतवाढ देण्याची मागणी
नवी दिल्ली – देशात यंदा खरिप कडधान्य पिकांची लागवड लांबल्याने काढणीलाही उशीर होत आहे. त्यातच यंदा कडधान्य उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत घटण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे व्यापारी संघाकडून कडधान्य आयातीसाठीच्या परवान्यांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्राहक कल्याण मंत्रालयाने मंगळवारी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव वाणिज्य मंत्रालयाकडे पाठविला आहे.
२०१८-१९ मध्ये खरिपातील कडधान्य उत्पादन ८६ लाख टन होते. त्यामुळे कडधान्य आयात करून बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी संघाने आयात परवान्यांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यामुळे केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत परवान्यांना मुदतवाढ देण्याची मागणी वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, १७ ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
66
0