AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऑनलाइन निविष्ठा खरेदी हा शेतकऱ्यांचा हक्क !
समाचारAgrowon
ऑनलाइन निविष्ठा खरेदी हा शेतकऱ्यांचा हक्क !
➡️देशातील काही निविष्ठा उत्पादक कंपन्यांनी ऑनलाइन विक्री सेवा वाढविल्यामुळे विक्रेत्यांच्या संघटनेने विरोध सुरू केला आहे. ‘ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन’ने याबाबत कंपन्यांना पत्र पाठवले असून, २० ऑगस्टपूर्वी कंपन्यांनी भूमिका स्पष्ट न केल्यास गावपातळीवरील विक्री बंद करण्याचा इशारा दिला आहे. ➡️इतर क्षेत्रांत ऑनलाइन बाजार सुविधा ) आणि सेवा प्रभावीपणे उपलब्ध होत असताना, कृषी निविष्ठांची ऑनलाइन खरेदी-विक्री सेवा हा शेतकऱ्यांना हक्क आहे. कंपन्यांच्या ऑनलाइन निविष्ठा विक्रीला विरोध करणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांची नवी पिढी टेक्नोसॅव्ही आहे, अशा वेळी त्यांना बाजार आणि तंत्रज्ञान स्वातंत्र्याचा स्पर्धात्मक लाभ आवश्‍यक मिळायला हवा, अशा आशयाच्या प्रतिक्रिया शेतकरी नेत्यांसह कृषितज्ज्ञ, उद्योजकांनी दिल्या आहेत. तसेच कृषी विभाग आणि सरकारने याची जबाबदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केली आहे. ➡️देशातील काही निविष्ठा उत्पादक कंपन्यांनी ऑनलाइन विक्री सेवा वाढविल्यामुळे विक्रेत्यांच्या संघटनेने विरोध सुरू केला आहे. ‘ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन’ने याबाबत कंपन्यांना पत्र पाठवले असून, २० ऑगस्टपूर्वी कंपन्यांनी भूमिका स्पष्ट न केल्यास गावपातळीवरील विक्री बंद करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ➡️प्रतिक्रियांमधील मुद्दे. : - स्पर्धेच्या युगात प्रत्येकाने बदलणे, तशी व्यवस्था, सेवा प्रदान करणे आवश्‍यक आहे - तंत्रज्ञानाच्या माध्यमांतून बदल होऊच नये, असे आता होऊ शकत नाही - शेतकरी ठरवेल त्याला कशा सेवा हव्या आहेत, यापद्धतीने वेळ आणि पैसाही वाचतो. - ऑनलाइन पद्धतीने कृषी निविष्ठांची विक्री ही सध्याच्या काळाची महत्त्वाची गरज - बदल आत्मसात करणे, व्यवस्था स्पर्धाक्षम व तंत्रज्ञानाभिमुख होणे संयुक्तिक आहे - शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्याबरोबरच बाजारपेठेचे देखील स्वातंत्र्य हवे - शेतकऱ्यांची नवी पिढी टेक्नोसॅव्ही, त्यांना निविष्ठा खरेदीचे स्वातंत्र्य असावे - तंत्रज्ञानाच्या युगात उगाच ऑनलाइन विपणन सेवेला विरोध करणे चुकीचेच ➡️प्रतिक्रियांमधील सूचना/अपेक्षा : - ऑनलाइन विक्री करताना संबंधित उत्पादनाचा दर्जा आणि किंमत ही योग्यच असावी. - कृषी विभागाने एक योजना तयार करावी, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. - शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी, ऑनलाइन प्रणाली वापराबाबत प्रशिक्षण द्यावे. - विक्रेत्यांनी शेतकऱ्यांप्रती आपली सेवा आणि विश्‍वासार्हता कायम ठेवावी, त्यांनाही संधी मिळावी. ☑️संदर्भ:- Agrowon हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
0
इतर लेख