AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऑटोमॅटिक ट्रॅक्टर ची वैशिष्ट्ये!
ट्रॅक्टरकृषी जागरण
ऑटोमॅटिक ट्रॅक्टर ची वैशिष्ट्ये!
➡️या शेती उपयोगी यंत्र मध्ये ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या अगदी जिव्हाळ्याच्या असते. ट्रॅक्टर निर्मिती मध्ये भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांपैकी जॉन डियर ही एक शेती क्षेत्रासाठी लागणारी विविध प्रकारची यंत्रे तयार करणारी कंपनी आहे. ➡️या कंपनीने नुकताच कंजूमर इलेक्ट्रॉनिक शो २०२२ मध्ये एक फुल्ली ऑटोमॅटिक ट्रॅक्टर लॉन्च केलाअसूनया ट्रॅक्टर चे मॉडेल चे नाव आहे 'डियर ८आर' असे आहे. या ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने खोलवर नांगरणी, जीपीएस गाईडन्स आणि नव्या ऍडव्हान्स तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्ये ➡️ऑटोमॅटिक ट्रॅक्टरमध्ये १२ स्टेरिओ कॅमेरे आहेत. ज्यामुळे ३६० अंश यामधील अडथळे शोधून त्याला अंतर मोजणे शक्य होते. ➡️या ट्रॅक्टरचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना या ट्रॅक्टर ला शेतात नेऊन ऑटोमॅटिक ऑपरेशन साठी कन्फिगर करणे आवश्यक असते. ➡️हे ट्रॅक्टर जॉन डियर ऑपरेशन सेंटर मोबाईल ॲप च्या साह्याने उजवीकडे किंवा डावीकडे वळवता येते. याशिवाय लाईव्ह व्हिडिओ, फोटो, डेटा आणि मॅट्रिक्स दाखवते. ➡️तसेच शेतकऱ्यांना ऑटोमॅटिक पद्धतीने ट्रॅक्टरचा वेग तसेच नांगरणी करताना खोली कमी-जास्त करता येते. संदर्भ:-कृषी जागरण, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
2
इतर लेख