कृषि वार्ताAgroStar
ऑगस्ट – जैविक खतांचा योग्य वेळ
👉 पावसाळ्याच्या हंगामात ऑगस्ट महिना पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात मातीमध्ये पुरेशी ओलावा असते आणि पिकांची मुळे पोषक तत्वे जलद गतीने शोषून घेतात. त्यामुळे या महिन्यात जैविक खतदेणे अत्यंत फायदेशीर ठरते.👉 जैविक खतांमध्ये शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खास, निंबोळी पेंड, हाडांचे चूर्ण इत्यादींचा समावेश होतो. हे मातीची सुपीकता वाढवतात, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करतात आणि मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढवतात. यामुळे पिके अधिक निरोगी राहतात आणि रोग व कीड यांच्यावरील प्रतिकारशक्ती वाढते.👉 ऑगस्टमध्ये पिकांची वाढ जलद होते, अशा वेळी जैविक खत दिल्यास त्याचा परिणाम लवकर दिसतो. हे पिकांच्या पोषण संतुलनाला जपते आणि दीर्घकालीन फायदा देते. रासायनिक खासासोबत योग्य प्रमाणात जैविक खासांचा वापर केल्यास मातीचे आरोग्य सुधारते आणि उत्पादनात वाढ होते.👉 जैविक खतांचा वापर कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे ऑगस्ट महिना हा त्याचा योग्य आणि प्रभावी वापर करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे.👉 संदर्भ : AgroStarवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.