हवामान अपडेटAgrostar
ऑक्टोबरमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस!
➡️महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील अनेक भागात काल रात्री मुसळधार पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच आजही भारतीय हवामान खात्याने राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही पाऊस कोसळणारच असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.आजच्या लेखात आपण बगूया कोणत्या भागात अजून पाऊस होण्याची शक्यता आहे याबद्दल संपूर्ण माहिती.
➡️मुंबई, रायगड, पुणे, पालघर, ठाणे यासह राज्यातील अनेक भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुसळधार पावसाचा इशारा असताना राज्यात विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
➡️या राज्यांमध्ये पावसाचा इशारा :
➡️स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात चक्री वाऱ्यांचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये अजूनही परतीच्या पावसाची शक्यता आहे. तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्रासह अनेक राज्यांतही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
➡️त्याचबरोबर तामिळनाडू आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. यामुळे आयएमडीने येथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
➡️संदर्भ:-Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.