AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हायरल जुगाडtimesnowmarathi
ऐकावे ते नवलंच! चक्क रिकाम्या ड्रमपासून बनवले वॉशिंग मशीन!
➡️पूर्वीच्या काळात सर्वत्र हातानेच कपडे धुण्याचा प्रकार होता. मात्र कालांतराने हे काम सोपे करण्यासाठी वॉशिंग मशीन आले. ➡️दरम्यान, बहुतांश ठिकाणी आजही असे काही लोक आहेत ज्यांच्याकडे मशीन नाही आणि ते हाताने कपडे धुतात. त्याचबरोबर काही लोक असे देखील आहेत की ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन नाही, पण त्यांना कपडे धुण्यासाठी जुगाड सापडला आहे. लक्षणीय बाब म्हणजे सध्या अशाच एका जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तर हा जुगाड पाहून चक्क इंजिनीअरही फेल होईल. जुगाडातून बनवले वॉशिंग मशीन ➡️दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने खराब कपडे धुण्यासाठी गावठी जुगाडातून चक्क ड्रमपासून वॉशिंग मशीन बनवल्याचे दिसून येते. हा जुगाड पाहिल्यानंतर सर्वाच्यांच मनात येईल की या जुगाडासमोर मोठ मोठे इंजिनीअरही फेल झाले आहेत. ➡️व्हिडीओ दिसत असलेल्या या निळ्या रंगाच्या ड्रमचा वापर पाणी साठवण्यासाठी केला जातो. मात्र त्या व्यक्तीने जुगाड करून वॉशिंग मशीन बनवले. जुगाड करणाऱ्या व्यक्तीने ड्रममधील इलेक्ट्रिक मोटरचा वापर करून ते यंत्र बनवले आहे. ➡️लक्षणीय बाब म्हणजे वॉशिंग मशीन बनवणाऱ्या व्यक्तीचा जुगाड पाहिल्यानंतर सर्वच जण विचारात पडतील यात काही शंका नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. संदर्भ:- timesnowmarathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
13
3