AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऐकलंत का ..? गॅस सिलेंडर १३५ रुपयांनी झालाय स्वस्त !
समाचारAgrostar
ऐकलंत का ..? गॅस सिलेंडर १३५ रुपयांनी झालाय स्वस्त !
☑️LPG सिलेंडर (स्वयंपाकाचा गॅस) च्या किंमतीत आज ०१ जून रोजी मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची (१९ किलो) किंमत प्रति सिलेंडर १३५ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजपासून हे नवीन दर लागू करण्यात येणार आहे. ☑️आता व्यावसायिक सिलिंडरचे भाव इतके वाढले आहेत : या बदलानंतर दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत २,२१९ रुपयांवर पोहोचली आहे. याआधी हे सिलेंडर २,३५४ रुपयांना मिळत होते. मुंबईत २,३०६ रुपयांवरून २,१७१.५० रुपयांवर आणि चेन्नईमध्ये २,३७३ रुपयांवरून २,५०७ रुपयांवर आली आहे. सततच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्याने लोकांना दिलासा मिळणार आहे. ☑️गेल्या महिन्यात दोनदा वाढले भाव : याआधीही गेल्या महिन्यात १९ तारखेला घरगुती एलपीजी सिलेंडर आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यामुळे १४ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात ३.५० रुपयांनी तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ८ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. याआधीही मे महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात एकदा वाढ करण्यात आली होती. परंतु आता १ जून पासून व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळला आहे. ☑️संदर्भ:-AgroStar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
3
इतर लेख