समाचारन्यूज १८लोकमत
एसबीआय किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना पिककर्ज!
➡️एसबीआयचे किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना पिक लागवडीचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे आणि वेळेवर कर्ज उपलब्ध करत आहे. त्याशिवाय बँकेतर्फे शेतकऱ्यांना आकस्मिक खर्चासाठी आणि पूरक उपक्रमांच्या खर्चाची काळजी घेतली जात असून त्यासाठी कर्जदारांना त्यांच्या गरजेनुसार कर्ज मिळावे यासाठी केवळ एक सोपी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
किसान क्रेडिट कार्डसाठीची पात्रता
➡️ सर्व शेतकरी-वैयक्तिक/संयुक्त कर्जदार, जे मालक आहेत आणि लागवड करतात.
➡️ भाडेशुल्कावर शेती करणारे शेतकरी, तोंडी पट्टेदार, शेती वाटेकरी.
➡️ शेतकऱ्यांचा बचतगट किंवा संयुक्त लायबिलिटी समूह, ज्यामध्ये भाडेशुल्कावर शेती करणारे शेतीकरी, शेती वाटेकरी यांचा समावेश असतो.
किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाचा व्याजदर
➡️3 लाख रुपयांपर्यंत 7 टक्के.
➡️ 3 लाख रुपयांपेक्षा जास्त – त्या त्या वेळेनुसार लागू
एसबीआय किसान क्रेडिट कार्डासाठी कसा अर्ज करावा?
➡️ एसबीआयवरून अर्ज डाउनलोड करा - https://sbi.co.in/documents/14463/22577/application+form.pdf/24a2171c-9ab5-a4de-08ef-7a5891525cfe
➡️ शेतकऱ्यांना थेट एसबीआयच्या शाखेला भेट देऊन केसीसी अर्जाचा नमुना घेता येईल.
➡️ आवश्यक माहिती भरून शाखेमध्ये अर्ज जमा करा.
➡️ बँक अर्जाचे परीक्षण करेल, अर्जदाराच्या तपशीलाची छाननी करेल व कार्ड मंजूर करेल.
कागदपत्रे
➡️ पत्ता आणि ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना इत्यादी (यापैकी कोणतेही एक)
➡️ शेती जमिनीची कागदपत्रे
➡️ अर्जदाराचा अद्यावत पासपोर्ट आकाराचा फोटो
➡️अधिक माहितीसाठी संकेतस्थळाची लिंक - https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/crop-loan/kisan-credit-card#show
अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- न्युज १८ लोकमत,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.