समाचारABP Live
एसबीआयच्या ATM मधून पैसे काढण्यासाठीचे नियम बदलले!
➡️ भारतीय स्टेट बँकच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी. बँकेनं ATM मधून पैसे काढण्यासाठीचे नियम पुन्हा बदलले आहेत. एसबीआयने एटीम (ATM ) मधून पैसे काढणे सुरक्षित करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक व्यवहार आणखी सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
नवा नियम काय?
➡️ एसबीआय ग्राहकांना आता एसबीआय एटीम मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल. त्यांच्या एसबीआय एटीएममध्ये नोंदणी केलेल्या ग्राहकांच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, जो एटीएम मशीनमध्ये टाकल्यानंतरच ग्राहक पैसे काढू शकतील.
काय आहे नवी पद्धत?
➡️ जेव्हा तुम्ही एटीएममधून पैसे काढायला जाल तेव्हा तुमचा मोबाईल तुमच्या सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे. एटीएममधून सामान्य पद्धतीनं पैसे काढण्यासाठी, तुम्हाला पूर्वीप्रमाणेच प्रक्रिया करावी लागेल आणि त्यात पिन टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी विचारला जाईल, जो तुमच्या मोबाइलवर येईल. तो पिन एटीएम मशीनवर टाका आणि त्यानंतर तुम्ही टाकलेली रक्कम तुम्हाला मिळेल.
➡️ जर तुमच्याकडे एसबीआय कार्ड असेल आणि तुम्ही एसबीआय एटीम (ATM) मधून पैसे काढत असाल तर ही OTP प्रक्रिया आवश्यक असेल. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला ओटीपीची गरज भासणार नाही.
संदर्भ:- ABPLive,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.