AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एसबीआयच्या ग्राहकांना मोफत दिला जातोय 2 लाखांचा फायदा!
समाचारzeenews.india
एसबीआयच्या ग्राहकांना मोफत दिला जातोय 2 लाखांचा फायदा!
देशातील सर्वात मोठी बँक SBI च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. SBI आपल्या ग्राहकांना २ लाख रुपयांचा लाभ मोफत देत आहे.रुपे (RuPay) डेबिट कार्ड वापरणाऱ्या सर्व जन-धन खातेधारकांना 2 लाख रुपयांपर्यंतचे मोफत अपघाती कव्हर देत आहे. त्याची प्रक्रिया जाणून घेऊया. कसा मिळेल २ लाखाचा कव्हर ग्राहकांना त्यांचे जन धन खाते उघडण्याच्या कालावधीनुसार एसबीआयकडून विम्याची रक्कम निश्चित केली जाईल. ज्या ग्राहकांचे प्रधानमंत्री जन धन योजना. जन धन खाते २८ ऑगस्ट २०१८ पर्यंत उघडले गेले आहे, त्यांना जारी केलेल्या रुपे(RuPay) जन धन खाते कार्डवर १ लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम मिळेल. तर २८ ऑगस्ट २०१८ नंतर जारी केलेल्या (RuPay) कार्डांवर २ लाख रुपयांपर्यंतचे अपघाती कव्हर बेनिफिट उपलब्ध असेल. या लोकांना असा मिळेल फायदा प्रधानमंत्री जन धन योजना ही एक योजना आहे ज्या अंतर्गत बँका, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये देशातील गरिबांचे खाते शून्य शिल्लक वर उघडले जाते. प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये कोणतीही व्यक्ती केवायसी कागदपत्रे जमा करून ऑनलाइन किंवा बँकेत जाऊन जन धन खाते उघडू शकते. आवश्यक कागदपत्रे 1. विमा दावा फॉर्म. 2. मृत्यू प्रमाणपत्राची प्रत. 3. कार्डधारक आणि नामनिर्देशित व्यक्तीची आधार प्रत. 4. मृत्यू इतर कारणामुळे झाला असल्यास एफएसएल अहवालासह शवविच्छेदन अहवालाची प्रत. 5. अपघाताचा तपशील देणारा एफआयआर किंवा पोलिस अहवालाची मूळ किंवा प्रमाणित प्रत. 6. कार्ड जारी करणार्‍या बँकेच्या वतीने अधिकृत स्वाक्षरीकर्त्याने योग्यरित्या स्वाक्षरी केलेला घोषणापत्र आणि बँक स्टॅम्प. 7. त्यात बँक अधिकाऱ्याचे नाव आणि ईमेल आयडीसह संपर्क तपशील असावा. संदर्भ:-zeenews.india, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
3
इतर लेख