AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एसबीआयची शेतकऱ्यांना हाक ! मिळवा कमी व्याजदरात एग्री गोल्ड लोन
कृषी वार्ताAgrostar
एसबीआयची शेतकऱ्यांना हाक ! मिळवा कमी व्याजदरात एग्री गोल्ड लोन
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कोरोनासारख्या संकटात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे स्टेट बँक शेतकऱ्यांसाठी एग्री गोल्ड लोन ही योजना सुरू केली आहे. आतापर्यंत ५ लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. जर आपल्याही कर्ज घ्यायचे असेल तर आपण आपल्या शेतीचे कागदपत्र बँकेला दाखावे लागतील. कागदपत्र दाखवल्यानंतर बँक आपल्याला कर्ज देईल. विशेष म्हणजे या एग्री गोल्ड लोन साठी बँकेने अत्यंत कमी व्याजदर आकारले आहे. एसबीआयच्या या योजनेंतर्गत शेतकऱ्याला सोन्याचे दागिने बँकेत जमा करावे लागतील. त्यानंतर शेतकरी आपल्या अपेक्षेप्रमाणे कर्ज घेऊ शकतो. पण यात एक अट आहे, ती म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. कारण जमिनीचे कागदपत्र बँकेत जमा करावी लागतात. अॅग्री गोल्ड लोन योजना काय आहे? यात दोन प्रकारची कर्ज आहेत एग्री गोल्ड लोन हे पीक उत्पन्न आणि मल्टी पर्पस गोल्ड लोन आहे. एग्री गोल्ड लोन हे पीक उत्पन्नासाठी असून याची मर्यादा ही ३ लाख ते त्यापेक्षा अधिकची आहे. तीन लाखाच्या कर्जावर ७ टक्के व्याजदर तर त्यापेक्षा अधिकच्या कर्जासाठी ९.९५ टक्के व्याजदर आहे. मल्टी पर्पज गोल्ड कर्जासाठी ९.९५ टक्के व्याजदर आहे. एसबीआय गोल्ड लोन एसबीआयसाठी आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो. ओळखपत्र- आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना. राहण्याचा पत्ता मतदान कार्ड जमिनीचा उतारा सात बारा उतारा कर्ज घेण्यासाठी काय कराल? जर आपल्याला एग्री गोल्ड लोन घ्यायचे असेल तर आपण थेट बँकेत जाऊ शकतात.किंवा योनो अॅप द्वारे तुम्ही अर्ज करु शकता. याशिवाय तुम्ही ऑनलाईनही कर्जासाठी अर्ज करु शकता.https://sbi.co.in संदर्भ - २८ एप्रिल २०२० कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा.
334
0
इतर लेख