AgroStar
एलपीजी सब्सिडी बँक खात्यात जमा होत नसल्यास अशी करा तक्रार!
कृषि वार्ताTV9 Marathi
एलपीजी सब्सिडी बँक खात्यात जमा होत नसल्यास अशी करा तक्रार!
➡️ अनेकांच्या खात्यात गॅस टाकीवरील अनुदान मिळत नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे याचा सर्वसामान्यांवर मोठा भार पडतोय. तुमच्याही खात्यात हे अनुदान येत नसेल तर तुम्ही याबाबत तक्रार करु शकता. ➡️ आधी नागरिकांना एलपीजी गॅस सिलिंडर सरकारच्या केवळ 300-350 रुपयांमध्ये मिळायचा. त्यावेळी सरकारचं अनुद थेट कंपन्यांकडे येत असल्यानं सर्वसामान्यांना गॅस टाकी सवलतीच्या दरात मिळायची. त्यानंतर डीबीटी योजना आली आणि गॅस सिलिंडरची किंमत वाढली. सध्या याच गॅस सिलिंडरची किंमत 800 रुपयांपर्यंत पोहचलीय. मात्र, अनेकांच्या खात्यात गॅस टाकीवरील अनुदान मिळत नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे याचा सर्वसामान्यांवर मोठा भार पडतोय. तुमच्याही खात्यात हे अनुदान येत नसेल तर तुम्ही याबाबत तक्रार करु शकता. ➡️ यासाठी एलपीजी गॅस पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार करता येते. याशिवाय टोल फ्री नंबर 18002333555 वर कॉल करुनही तुम्ही तक्रार करु शकता. यासाठी तुमच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होतेय की नाही हे तपासा. ➡️ गॅस सब्सिडी तुमच्या खात्यावर जमा होतेय की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. www.mylpg.in या वेबसाईटवर उजव्या बाजूलाचा फोटो (Bharat, HP, Indane) दिसेल. या ठिकाणी तुमची गॅस टाकी ज्या कंपनीची आहे तेथे क्लिक करा. ➡️ या ठिकाणी तुम्ही याआधी ही सेवा वापरली नसेल तर तुमची नोंदणी करुन खातं तयार करा. त्यानंतर लॉगिन करा. येथे उजव्या बाजूला सिलिंडर बुकिंग हिस्ट्री पाहण्याचा पर्याय आहे. तेथे क्लिक केल्यावर तुम्हाला कधी कधी किती सब्सिडी मिळाली हे दिसेल. ➡️ जर तुम्हाला येथे सब्सिडी मिळाली नसल्याचं दिसलं तर फीडबॅक पर्यायावर क्लिक करुन तक्रार नोंदवा. याशिवाय टोल फ्री नंबर 18002333555 वर कॉल करुनही तक्रार करता येते. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- tv9marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
12
इतर लेख