AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एरंडी मधील उंट अळी व पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
एरंडी मधील उंट अळी व पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
एरंडीमधील लहान उंट अळी हे झाडावरील पाने खरडतात पण प्रौढ अळी नसा वगळता पाने खातात. पाने खाणारी लहान अळी पानांच्या खालच्या बाजूला राहून पानामधील हरितद्रव्य खाते.मोठी अळी पानावर राहून पाने खाते तसेच वनस्पतीचे शेंडे पण खातात. व्यवस्थापन • पतंग आकर्षित करण्यासाठी लाईट ट्रप लावा. • पानासह खालच्या थव्यासह आणि अळीचे अंडी गोळा करून आणि नष्ट करा. • तसेच एरंडीमधील उंटअळी व पाने खाणाऱ्या मोठ्या अळ्यांना हाताने गोळा करून नष्ट कराव्यात • बॅसिलस थुरांजेनेसीसची पावडर ची हेक्टरी १ -१.५ किलो फवारणी करावी.
• पाने खाणाऱ्या अळीवर न्युक्लिअर पॉलीहायड्रसीस वायरस@२५० LU प्रती हेक्टरीची फवारणी करावी. • एरंडी वर निंबोळी अर्काची @५%किंवा पानांच्या अर्काची @१०% फवारणी करावी. • जेव्हा अळींची संख्या प्रती झाड ४ च्या वर असेल तेव्हा कीटकनाशकाची फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
128
1