AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एक शेतकरी एक डीपी योजना!
योजना व अनुदानAgrostar
एक शेतकरी एक डीपी योजना!
👉🏼राज्य सरकारची एक शेतकरी एक डीपी योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जाते. म्हणजेच एका शेतकऱ्याला एक स्वतंत्र ट्रांसफार्मर या माध्यमातून दिले जाते. असे करण्यामागे शासनाचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना नियमितपणे आणि अखंडित असा विजेचा पुरवठा व्हावा.या माध्यमातून एका शेतकऱ्याला एक स्वतंत्र ट्रांसफार्मर दिला जातो. परंतु यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा स्वतःचा हिस्सा भरणे गरजेचे असते. 👉🏼सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना योजनेच्या अंतर्गत ट्रांसफार्मर मिळवण्याकरिता सात हजार रुपये प्रति एचपी इतकी रक्कम भरणे गरजेचे असते. त्यासोबतच एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति एचपीचा खर्च करणे गरजेचे असते. ही रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यानंतर स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर घेण्याकरिता जो काही जास्तीचा खर्च येतो तो राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जातो. 👉🏼लागणारी आवश्यक कागदपत्रे: १.आधार कार्ड २.पॅन कार्ड ३.रेशन कार् ४.सातबारा उतारा ५.आठ चा उतारा ६.लाभार्थी जर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील असतील तर त्यांना विशेष लाभ दिला जाणार असल्यामुळे अशा शेतकऱ्यांना जातीचा दाखला आवश्यक आहे. ७.तसेच अर्जदाराकडे आधार लिंक असलेले बँक खाते क्रमांक असणे देखील गरजेचे असून पासबुकची प्रत देखील लागणार आहे. 👉🏼या योजेकरिता अर्ज करण्यासाठी क्लिक करा: https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getNewConnectionRequest 👉🏼संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
116
49
इतर लेख