AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एक शेतकरी एक डीपी योजना!
योजना व अनुदानAgrostar
एक शेतकरी एक डीपी योजना!
➡️महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना चालू केली होती. राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज, लाईट जाणे, तारांवर प्रकाश टाकणे, लाईट, वीज कट,अश्या सर्व बाबींचा विचार करून एचव्हीडीएसला उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या योजनेचा आतापर्यंत ९० हजार शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. ११३४७ कोटींच्या या योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. ➡️लाईट संधर्भात गंभीर समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. यामुळे अखंडित आणि शाश्वत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास अडचणी येतात. या समस्येचे निवारण करण्यासाठी राज्यातील कृषी पंपांना यापुढे उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उच्च दाब वितरण प्रणाली मुळे अखंडित व शाश्वत वीजपुरवठा होण्यासह विद्युत हानी अपघात व रोहित्र बिघाड या तिन्ही बाबींमध्ये घट होणार आहे. यामुळे रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होणार असून, अनधिकृत वीज जोडणी होणार नाही. ➡️ज्या शेतकऱ्यांच्या २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति HP ७,००० रुपये द्यावे लागतील. ➡️अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना व ५,००० रुपये द्यावे लागतील. ➡️आवश्यक कागदपत्रे: १.आधार कार्ड २.मोबाइल नंबर ३.शेताचे ७/१२ प्रमाणपत्र ४.जातीचे प्रमाणपत्र ५.बँक खाते क्रमांक 👉🏻अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा. – https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getNewConnectionRequest&Lang=English 👉🏻ऑफिसिअल वेबसाइट – mahadiscom.in 👉🏻हेल्पलाईन नंबर –शेतकरी मित्रांनो जर आणखीही तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करू शकता. 👉🏻राष्ट्रीय टोल-फ्री – १९१२ / १९१२० 👉🏻महावितरण टोल-फ्री – १८००-२१२-३४३५ / १८००-२३३-३४३५ ➡️संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
77
50
इतर लेख