AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एका चार्जवर 200 किमी धावणारी बाईक!
ऑटोमोबाईलAgrostar
एका चार्जवर 200 किमी धावणारी बाईक!
➡️जर तुम्ही आता पेट्रोल बाईक सोडून इलेक्ट्रिक बाईकचा विचार करत असाल आणि जर तुमच्या खिशाचे बजेट एक लाख रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला रिव्हॉल्ट RV400 ही सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक बाईक तसेच आणखी बरेच पर्याय मिळतील.एका चार्जवर, ही इलेक्ट्रिक मोटारसायकल 100-200 किमी पर्यंत प्रवास करण्यास सक्षम आहे. ➡️बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक बाईक : रिव्हॉल्ट RV400 ही इलेक्ट्रिक मोटारसायकलींच्या बाबतीत भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटारसायकलींपैकी एक आहे. जर या बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला रिव्हॉल्ट RV400 ही इलेक्ट्रिक बाईक 1.25 लाख रुपये एक्स-शोरूमम किमतीत मिळेल. या बाईकचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास असेल. आणि त्याची बॅटरी रेंज एका चार्जमध्ये 150 किमी पर्यंत असेल. ➡️त्याच वेळी, अलीकडे लॉन्च झालेल्या टॉर्क क्रॅटोसची किंमत 1.22 लाख ते 1.37 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. त्याचा टॉप स्पीड 105 किमी प्रतितास आहे. ही बाईक एका चार्जवर 180 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. याशिवाय ओबेन रॉर बाईक देखील यावर्षी लॉन्च करण्यात आलेली मोटरसायकल आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 1.03 लाख रुपये आहे. या बाईकचा कमाल वेग 100 किमी प्रतितास आहे आणि तिची बॅटरी रेंज 200 किमी पर्यंत आहे. ➡️ओडिसी आणि कबीरा ईव्ही बाइक्स: यानंतर ओडिसी इलेक्ट्रिक इव्होकिस आली. ज्याची बॅटरी रेंज 140 किमी आहे आणि टॉप स्पीड 80 किमी प्रति तास आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला ही बाईक 1.71 लाख रुपयांना मिळेल. कबीरा मोबिलिटी KM देखील अशीच एक बाईक आहे जी एका चार्जवर 150 किमी चालते. ➡️संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
3