एका अर्जावर १४ योजनांचा लाभ मिळवा!
कृषि वार्ताAgrostar
एका अर्जावर १४ योजनांचा लाभ मिळवा!
👉🏻केंद्र व राज्य सरकारच्या एकूण १४ योजनांचा लाभ शेतकऱ्यांना आता एकाच अर्जांवर मिळणार आहे. ‘डीबीटी’मध्ये कृषी योजनांचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज पडत नाही. तसेच भरलेल्या अर्जात शेतकरी पुन्हा बदल करून इतर योजनांचाही लाभ घेऊ शकतात. 👉🏻‘डीबीटी’मुळे शेतकऱ्यांना एका अर्जावर १४ योजनांचा लाभ मिळू शकतो. प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. यामध्ये लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातात. परंतु अर्ज भरताना शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे, त्याची योग्य निवड करणे गरजेचे आहे. 👉🏻अर्ज भरून झाल्यानंतर शेतकरी अर्जांची संख्या आणि शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान, यावरून दरवर्षी वेगवेगळ्या टप्प्यांवर लॉटरी काढून लाभार्थी निवडले जातात. कृषी विभागाकडील अर्जदार प्रत्येक शेतकऱ्याला योजनांचा लाभ मिळेपर्यंत त्या अर्जाची वैधता राहते. कृषी योजनांचा लाभ मिळावा म्हणून पात्र शेतकऱ्याने अर्ज केल्यानंतर त्यास हमखास लाभ मिळतोच. पण, लाभाचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. 👉🏻यामध्ये खालील योजनांचा समावेश होतो. 1. राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन (मल्चिंग, कोल्ड स्टोरेज, सामुहिक शेततळे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, शेडनेट, रेपरव्हॅन) 2. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (शेततळे, ठिबक, तुषार) 3. बिरसामुंडा कृषी क्रांती योजना (अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी विहिरी, पाईपलाईन, विहीर दुरुस्ती, आवजारे) 4. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (बियाणे, पॉवर टेलर, मळणी यंत्र, रोटावेटर, पंप, पाईप वगैरे) 5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना (अनुसूचित जाती शेतकऱ्यांसाठी विहिरी, पाईपलाईन, विहीर दुरुस्ती, आवजारे) 6. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (दोन हेक्टरपर्यंत फळबाग लागवडीसाठी १०० टक्के अनुदान) 7. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजना (५० टक्के अनुदान, नर्सरीसाठी शेडनेट, पॉलिटनेल, प्लास्टिक करेट) 8. राष्ट्रीय कृषी विकास योजना (शेततळे अस्तीकरण, शेडनेट, पॉलीहाऊस, कांदा चाळ) 9. राज्य कृषी योजना (ट्रॅक्टर, आवजारे) 10. कृषी यांत्रिकी उपअभियान (ट्रॅक्टर, आवजारे) 11.राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर एक लाख व सव्वालाख अनुदान व आवजारे ४० टक्क्यांपर्यंत अनुदान) 👉🏻संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
11
इतर लेख