AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एकात्मिक पद्धतीने करा तण व्यवस्थापन!
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
एकात्मिक पद्धतीने करा तण व्यवस्थापन!
➡️ कुठल्याही पिकाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना तणांची सगळ्यात मोठी समस्या भेडसावते. त्याचबरोबर तण व्यवस्थापन माहितीचा अभाव असल्यामुळे त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे कठीण जाते.याचा विपरीत परिणाम पिकावर होतो. तण पिकासोबत अन्नद्रव्ये, पाणी, जागा, सूर्यप्रकाश यासाठी स्पर्धा करते त्याचबरोबर कीड - रोगांचा प्रादुर्भाव देखील पिकात जास्त प्रमाणात दिसून येतो. या सगळ्या कारणांमुळे पिकाच्या उत्पादनात घट दिसून येते आणि उत्पादनाची गुणवत्ता देखील खालावते. पिकात तणांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील पद्धतीने तणांचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे. • उन्हाळ्यात जमिनीची खोलवर मशागत करून जमीन तापून द्यावी आणि आधीच्या पिकाचे व तणांचे अवशेष नष्ट करावे • शेणखत अथवा कंपोस्ट कुजल्यानंतर वापरावे, तसेच खताच्या खडयावर तण वाढु देऊ नये. • ओलितांचे दांड, बांध नेहमी तणविरहीत ठेवावे • शक्य असेल तिथे सलग पिकाऐवजी आंतरपीक किंवा हिरवळीचे पिक घ्यावे • पिकात ठिबक व आच्छादन/मल्चिंग चा वापर करावा • उभ्या पिकात तणांचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर त्वरित खुरपणी अथवा कोळपणी करून तण नियंत्रित करावे • रासायनिक तणनाशकांचा वापर करण्यापूर्वी त्याच्या वापराबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊनच वापर करावा. उदा पीक व तण उगवणीपूर्वीचे व उगवणीनंतरचे तणनाशक व निवडक, बिन निवडक प्रकारातील तणनाशक इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तणनाशक वापरण्याची वेळ, पद्धत शिफारस केलेले प्रमाण ही माहिती देवल जाणून घ्यावी. अश्या पद्धतीने व्यवस्थापन केले तर नक्कीच पिकात तणांचे व्यवस्थापन करणे सोपे जाईल व पिकाची गुणवत्ता देखील सुधारेल. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
8
3