गुरु ज्ञानAgroStar
एकात्मिक कीड, रोग व अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
🌱एकात्मिक कीड, रोग आणि पोषक व्यवस्थापनची अंमलबजावणी करणे हे शेतीमध्ये जास्त आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
🌱शेताची देखरेख आणि मूल्यांकन: कीटक आणि रोगांच्या प्रादुर्भावासाठी तसेच पोषक तत्वांच्या कमतरतेसाठी शेताचे नियमित निरीक्षण करावे. किडींच्या तपासणी साठी फेरोमोन सापळे आणि चिकट सापळे यासारख्या तंत्रांचा वापर करा. मातीचा सामू व पोषक तत्वांची उपलब्धता जाणून घेण्यासाठी माती परीक्षण करावे.
🌱मशागती पद्धत: कीटकांच्या जीवन चक्रात व्यत्यय आणण्यासाठी आणि रोगाचा प्रादुर्भाव
कमी करण्यासाठी पीक फेरपालट पद्धत लागू करावी. आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करावा. कीटकांना आकर्षित करण्यासाठी आणि मुख्य पिकांपासून दूर ठेवण्यासाठी सापळा पिकांचा वापर करा. हवेचा प्रवाह सुधारण्यासाठी आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी झाडांमध्ये योग्य अंतर ठेवावे.
🌱जैविक नियंत्रण: जैविक बुरशीनाशक किंवा जैविक कीटक नाशकांचा वापर करावा
यांत्रिक आणि भौतिक नियंत्रण: कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी जाळी, पडदे किंवा कुंपण
यांसारखे भौतिक अडथळे वापरु शकतो, जेव्हा शक्य असेल तेव्हा कीटक किंवा रोगग्रस्त
वनस्पतींचे भाग कापून शेताबाहेर करावे.
🌱रासायनिक नियंत्रण: एकात्मिक कीड किंवा रोगाचे व्यवस्थापन तत्त्वांचे पालन करा,
ज्यात कीटकनाशकांची किंवा बुरशीनाशकांची योग्य निवड, वापरायची वेळ, मात्रा आणि
वापरायची पद्धत यांचा समावेश आहे.
🌱पीक पोषक तत्वांचे व्यवस्थापन: खताचा वापर मातीचे परीक्षण करून व पिकाच्या गरजेनुसार करावा. मातीचे आरोग्य आणि पोषक तत्वांची उपलब्धता सुधारण्यासाठी कंपोस्ट खत आणि सेंद्रिय खतांचा वापर करावा. कीटक, रोग आणि पोषक व्यवस्थापन पद्धतींच्या तपशीलवार नोंदी ठेवावी.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.