AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एकात्मिक किड व्यवस्थापनात कामगंध सापळ्याचा वापर
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
एकात्मिक किड व्यवस्थापनात कामगंध सापळ्याचा वापर
कामगंध सापळे शेतामध्ये वापरल्यास नर किडिंना मादी किडींच्या कृत्रिम गंधाने आकर्षित करुन सापळ्यात अडकवता येते. वेगवेगळ्या किडींचा (कीटकांचा) कामगंध हा निसर्गताच वेगवेगळा असतो. प्रयोगशाळेत असे कृत्रिम प्रलोभने तयार करुन व्यवसयिक स्तरावर त्याचे उत्पादन केले जातात._x000D_ कामगंध सापळे काम करण्याची पध्दती:-_x000D_ कृत्रिम लिंग प्रलोभने वापरुन प्लास्टिकच्या नरसाळ्याच्या आकाराच्या सापळ्यात लावले जातात. मादीच्या वासाने या सापळ्याकडे नर आकर्षित होउन नर यात अडकवले जातात. सापळ्याच्या रचनेनुसार एकदा अडकलेले नर बाहेर पडु शकत नाही. नर सापळ्यात अडकुन पड ल्यामुळे नर मादी मिलनामध्ये बाधा येवुन पुढील पिढी तयार होत नाही परिणामी किड नियंत्रण सोप होते._x000D_ कीड व्यवस्थापनासाठी वापर:-_x000D_ जेंव्हा किडींचे प्रमाण अत्यल्प असते, अश्यावेळी पतंग पकडण्यासाठी कामगंध सापळ्यांचा चांगला उपयोग होऊ शकतो. यासाठी जास्त प्रमाणात कामगंध सापळे बसवल्यास मोठ्या प्रमाणात पतंग पकडले जाऊन परिणामी पुढील प्रजनन कमी करण्यास मदत होते.. अश्या प्रकारे किडींच्या संख्येत लक्षणिय घट होते. कामगंध सापळ्यांचा खर्च किटकनाशकांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. सापळे वर्षभर सहज वापरता येतात,फ़क्त नियमीत पणे ल्युर बदलावे लागतात.रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी होउन सेंद्रिय शेती मध्ये किड नियंत्रणाचा पर्याय उपलब्ध होतो. निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होते. कीड व्यवस्थापनाची हि पद्धती वापरण्यास अगदी सोपी व स्वस्त आहे,तसेच यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची आवश्यकता नाही._x000D_ _x000D_ कामगंध सापळे वापरतांना घ्यावयाची काळजी_x000D_ १) पिकातील किडिंच्या प्रकारानुसार ल्युरची निवड करावी सापळ्यात._x000D_ २) सर्वेक्षणासाठी प्रत्येक जातीच्या किटकासाठी हेक्टरी ५ सापळे वापरावेत परंतु किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी हेक्टरी १५ ते २० सापळे वापरावेत._x000D_ ३) सापळ्यामधील ल्युर १५ ते २० दिवसांनी बदलावेत. ल्युर लावताना हाताला पेट्रोल,डिझेल,सुंगधी पदार्थ,परफ़्युम,कांदा-लसुन,तंबाखु या सारखा उग्र वास नसावा._x000D_ ४) सापळा हा साधारणपणे पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून २ ते ३ फुटावर राहील असे लावावेत. तसेच पक्षी,पाळिव प्राणी मांजर,कुत्रे,लहान मुले या कडुन सापळ्यास नुकसान पोहचनार नाही याची काळजी घ्यावी_x000D_ ५) सापळ्यात अडकलेले पतंग २-३ दिवसांनी काढून नष्ट करावेत. सापळ्यात पावसाचे पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी_x000D_ बाजारात कांमगंध सापळे घेताना ल्युर पिका नुसार तसेच किडि नुसार मागुन घ्यावेत_x000D_ श्री तुषार उगले,पिक सरंक्षण तज्ञ,_x000D_
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
219
1