AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एकही झाड न कापता शेतकऱ्याने बांधला अप्रतिम रिसॉर्ट!
द बेटर इंडियाद बेटर इंडिया
एकही झाड न कापता शेतकऱ्याने बांधला अप्रतिम रिसॉर्ट!
➡️ 12 वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी 'खुशबू गुजरात की' या जाहिरातीतून गुजरातचे सौंदर्य कथन केले होते. या जाहिरातीमुळे आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले गीरचे जंगल जगभर प्रसिद्ध झाले. ➡️ गेल्या काही वर्षांत गीरच्या आजूबाजूच्या जंगलात पर्यटन व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. केवळ देशच नाही, तर जगभरातून लोक येथे भेट देण्यासाठी येत आहेत. अक्षरश: पर्यटकांसाठी शेतकरी शेतीमध्ये रिसॉर्ट बांधत आहेत. ➡️ गुजरातचे धनजीभाई पटेल या शेतकऱ्याने पर्यटन व्यवसायाचा फायदा घेत गीर सोमनाथ जिल्ह्यातील, तलाला तालुक्यातील भोजडे गावात 'अरण्य रिसॉर्ट' सुरू केले आहे. 7 एकरपैकी २ एकर जागेत रिसॉर्ट बांधले आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे वास्तू एक ही झाड न तोडता उभारले. ➡️ धनजीभाई सांगतात, “मी हे रिसॉर्ट भागीदारीत बांधले आहे. यासाठी प्रथम संपूर्ण आराखडा तयार केला. या कामासाठी अहमदाबादमधील इको-फ्रेंडली आर्किटेक्चर हिमांशू पटेल यांच्या हातात हा प्रकल्प सुपूर्द केला. ➡️ या रिसॉर्टमध्ये एकूण सात कॉटेज आहेत.सर्व कॉटेजमध्ये पारंपरिक पद्धतीने छतासाठी टाइलचा वापर करण्यात आला आहे. ज्यावर मातीच्या फरशा लावल्या आहेत. त्याचबरोबर खापरा बनवण्यासाठी लाकडाऐवजी गॅल्वनाइज्ड स्टील फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. खिडक्या आणि दरवाजे स्थानिक लाकडापासून बनलेले आहेत. ➡️ रिसॉर्टमधील भिंतींसाठी दगडाचा वापर केला आहे.आज हे गुजरातमधील लोकप्रिय रिसॉर्ट म्हणून ओळखले जाते. संदर्भ:- बेटर इंडिया, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
1
इतर लेख