AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऍस्टर फुल शेती लागवडीचे नियोजन!
गुरु ज्ञानAgrostar
ऍस्टर फुल शेती लागवडीचे नियोजन!
🌸ऍस्टर हे हंगामी फुलपीक असून त्यामध्ये पांढऱ्या, लाल, गुलाबी, जांभळ्या रंगाची फुले विशेषतः आढळतात. ऍस्टर फुलपिकाची लागवड वर्षभरातील तीनही हंगामात केली जाते. थंड हवामानात पिकाची वाढ चांगली होते व फुलांचा दर्जा देखील चांगला असतो. 🌸या पिकास भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. काळी कसदार, भारी व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत रोपांची मर मोठया प्रमाणावर होते त्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन लागवडीसाठी निवडावी. 🌸जास्तीत जास्त दर्जेदार फुले मिळण्यासाठी बियाण्याची रोपासाठी पेरणी सप्टेंबर/ऑक्टोबर महिन्यात केली जाते. रोपे साधारणपणे 25 ते 30 दिवसात तयार होतात. लागवडीसाठी सरी वरंबा पद्धतीचा वापर केला जातो. लागवड 60 X 30 सें. मी. किंवा 45 X 30 सें. मी. अंतरावर करावी. 🌸संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
0
इतर लेख